‘समन्वयवादी'
(डॉ. बाबूराव गायकवाड,
मराठी विभाग प्रमुख, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड)
गौरवग्रंथातील लेख
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तो वाचला की आपल्या दृष्टीपुढे माऊलीपण समूर्त होते. विटेवरल्या सावळ्या परब्रह्माला खेव देण्याची तळमळ संतांना का लागली होती हे उमगते. तो अभंग असा:-
अलीकडे तर वैज्ञानिक प्रयोगांनी स्त्रीचे श्रेष्ठत्व सप्रमाण सिद्ध केले आहे. केवळ स्त्रीच क्लोनिंग-तंत्राद्वारे आपल्या शरीरातील एखाद्या पेशीची गर्भपेशी बनवून ती गर्भाशयात वाढवू शकते आणि पुरुषाविना बाळाला जन्म देऊ शकते. उत्क्रांतीच्या सर्वोच्च स्थानावर पुरुष नव्हे, तर स्त्री उभी आहे, असाच याचा अर्थ होतो.
सृष्टिनिर्मितीचक्रात स्त्रीचे असे अपरिहार्य स्थान असल्यामुळे संतकवींना स्त्रीत्वाचा- विशेषत: तिच्या मातृरूपाचा मोह पडावा, यात नवल नाही. स्वत:कडे स्त्रीची भूमिका घेऊन पंढरीनाथाच्या दर्शनासाठी विरहव्याकुळ होणारे ज्ञानेश्वर उगाचच आपल्याला विराण्यांतून भेटत नाहीत. ‘दिनु तैसी रजनी मज जालिये माये । अवस्था लावूनि गेला अजुनि कां न ये ।।' अशा प्रत्ययकारी शब्दांतून ते आपल्या मनोवस्थेचे चित्रण करतात ते यामुळेच. स्त्रीच्या अनुभवविश्वातील गहिरेपण आणि तिचे आयुष्य कृतार्थ करणारे आईपण संतकवींना आणि संतकवयित्रींना सतत साद घालत राहिले आहे.
आई आणि वडील यांच्या मनोवस्थांतील अंतर स्पष्ट करणारा प्रसंग सांगता येईल. मूल जर चिखलात बरबटून घरात आले तर वडील त्याला पटकन् जवळ तर घेणार नाहीतच, पण ‘‘जा, तुझ्या आईकडे जा'' असे सांगतील. ते मूल आईजवळ जाताच ती त्याला स्वच्छ करील, स्वच्छ कपडे घालील आणि मग वडलाकडे पाठवेल. लेकबाळ सासरहून माहेरी आली तर आईच्याच कुशीत शिरून मुसमुसत राहते. तिला सासरी कोणते दु:ख आहे हे आईला न सांगताच समजते. आईचा पदर म्हणजे बाळाचे संरक्षक कवच. म्हणून जनाबाईने आपल्या भावविश्वात विठ्ठलाचे लेकुरवाळे रूप पाहिले आणि अभंगात ते शब्दबद्ध करून ठेवले.
अशी ही संतांची माउली! ती केवळ माउलीच नव्हे, तर शीतल सावलीदेखील आहे. रणरणत्या उन्हात वैराण माळ तुडवणा-या माणसालाच डेरेदार वृक्षाखालच्या थंडगार सावलीतले सुख काय ते कळते. वृक्षछायेतले गार सुख भोगायचे असेल तर उन्हात तापले पाहिजे. पोटात कावळे ओरडतात कसे, आतडी कशी गोळा होतात हे अनुभवायचे असेल तर पोटात भुकेचा डोंब उसळू द्यायला हवा. त्यानंतरच अन्न हे परब्रह्म का आहे, हे कळू शकते आणि अन्नसेवनानंतर सर्वांगावर तृप्ती कशी ओसंडत राहते, हेही समजते. त्याप्रमाणे जो संसारतापाने होरपळून निघतो अशा जीवालाच विठ्ठल ही ‘शीतल साउली' का आहे ते समजू शकते.
शीतल साउली असलेल्या विठाई माउलीला पान्हा फुटला आहे. हा पान्हा आहे प्रेमाचा. आईच्या दुधावर लेकराचा आणि गाईच्या दुधावर वासराचा निसर्गदत्त हक्क असतो. त्याप्रमाणे भक्ताचाही विठाई माउलीच्या प्रेमदुधावर हक्क असतो. म्हणून तिच्या मांडीवर बसून, कुशीत शिरून मनसोक्त दूध पिण्याची इच्छा त्याच्या मनात नांदत असते. आईच्या दुधावर बाळाच्या स्थूलदेहाचे पोषण होते, तर विठाईच्या प्रेमदुधाने भक्ताच्या अंतरंग-जीवनाचे -आध्यात्मिक पिंडाचे- पोषण होते. आईचे दूध बाळासाठी अमृतासारखे संजीवक असते, तसेच भक्तासाठी प्रेमदूधदेखील संजीवकच असते. ज्या प्रेमाने जन्ममृत्यूचे चक्र थांबून अमृतरूपी परमेशाचा लाभ होतो त्या प्रेमाची महती काय वर्णावी? त्याला कशासोबत तुळावे? प्रेमदुधाच्या प्राशनाने देह-मनावर ओसंडणारी तृप्ती कोणत्या शब्दांत सांगावी? ती सांगताना तर सागराची उपमाही अपुरीच पडेल.
बाळ दूर गेले तर आईला चिंता पडते. खरे तर तिला चिंताअसते ती रांगणा-या बाळाची, नीट चालणा-या मुलाची नव्हे. मूल घरभर रांगत असताना आई एका कोप-यात धान्य निवडत बसलेली असली तरी तिचे सर्व लक्ष बाळाकडेच असते. ते कुठे पडणार तर नाही, उंबरठ्याबाहेर तर जात नाही, याकडे ती नजर ठेवून असते. जणू त्याच्याभोवती आपल्या नजरेचा परकोट उभा करून असते. केवळ दृष्टीने कासवी आपल्या पिलांना भरवते अशी कविकल्पना आहे. त्याप्रमाणे केवळ दृष्टीनेच आई बाळाचे संरक्षण करीत असते. तिची दृष्टी बाळाच्या मागेपुढे भिरभिरत जणू त्याला सांभाळत असते. (यामुळेच ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी'च्या बाराव्या अध्यायात श्रीगुरूच्या कृपादृष्टीला माउली असे संबोधिले असावे.)
तान्ह्या बाळाला स्वत:ची चिंता करावी लागत नाही. त्याची सर्व चिंताआईच वाहत असते. त्याला भूक लागण्याआधी त्याची भूक आईलाच लागत असते, जाणवत असते. त्याची तहान आईलाच लागते. त्याप्रमाणे जो भक्त विठाई माउलीचे तान्हे बाळ होतो, त्याला पूर्ण आत्मसमर्पण करतो, त्याची सर्वचिंताविठाई माउली वाहते. (‘योगक्षेम वहाम्यहम्।' असे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने उगाच वचन दिलेले नाही.) पण त्यासाठी तान्हे बाळ मात्र होता आले पाहिजे. तुकाराम महाराज आपल्या भावविश्वात विठाई माउलीचे तान्हे बाळ होतात आणि आत्मप्रत्ययाने म्हणतात:-
वाढलेल्या वयात जर असे तान्हेपण अनुभवता आले तर जीवन कृतार्थ होणार नाही काय?
(डॉ. बाबूराव गायकवाड,
मराठी विभाग प्रमुख, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड)
गौरवग्रंथातील लेख
‘शीतल साउली आमुची माउली'...
डॉ.शे. दे. पसारकर
सोलापूर
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तो वाचला की आपल्या दृष्टीपुढे माऊलीपण समूर्त होते. विटेवरल्या सावळ्या परब्रह्माला खेव देण्याची तळमळ संतांना का लागली होती हे उमगते. तो अभंग असा:-
शीतल साउली आमुची माउली ।
विठाई वोळली प्रेमपान्हा ।।१।।
जाऊनि वोसंगा रिघेन वोरस ।
लागलें तें इच्छे पीईन वरी ।।२।।
कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि ।
अमृत संजीवनी लोटलीसे ।।३।।
आनंदाचा ठाव झाला माझे चित्तीं ।
सागर तो किती उपमेसी ।।४।।
सैर जाये पडे तयेसी सांकडें ।
सांभाळीत पुढें मागें आस ।।५।।
तुका ह्मणे चिंता कैसी ते मी नेणे ।
लडिवाळ तान्हें विठाईचें ।।६।।
संतांनी परमतत्त्वाला ‘माउली' असे संबोधिले आहे. माउलीएवढे जवळचे, जिव्हाळ्याचे, प्रिय असे दुसरे कोणी आपले असत नाही. वडील असतात, पण ते परके, त्रयस्थ. बाळ तर आईच्या उदरातच आकार घेत असते. हातापायांच्या हालचालीने तिला सुखवीत, त्रासवीत असते. तिच्या काळजाचा तुकडाच असते ते. बाळाचा जन्म हा आईचा पुनर्जन्मच असतो. तिच्या आतच ते रुजते, वाढते आणि जन्मजन्मांतरीचा ऋणानुबंध असल्याप्रमाणे, तिच्या उदराशी जोडलेली नाळ दाखवतच जगात प्रकट होते. म्हणून आजवर जगातल्या कोठल्याही बाळाला आपल्या आईची ओळख करून घ्यावी लागली नाही, वडलाची मात्र प्रत्येकाला ओळख करून घ्यावी लागते. ‘‘हे तुझे वडील, त्यांना ‘बाबा' म्हण,''असे आईने सांगितल्यानंतरच मूल आपल्या वडिलाला ओळखायला शिकते. आई-बाळाचे हे नाते असे पुरातन आणि निसर्गसिद्ध आहे- स्त्री आणि पुरुष ही विभागणी निसर्गाने सर्वप्रथम केली तेव्हापासूनचे! आईचे गर्भाशय हे नव्या, कोवळ्या जीवाचे जन्मस्थान असते आणि तिच्या प्रसववेदनेतूनच सुकुमार, लुसलुशीत सौंदर्याचे सर्जन होते. म्हणून बाळाच्या दृष्टीने माऊली हे सर्वस्व असते. जन्माच्या आधी ते तिच्या गर्भात आणि जन्मानंतर तिच्या अवतीभोवती सतत बागडत असते. अशा जिव्हाळ नात्यामुळेच अत्यंत जवळच्या वस्तूंचा निर्देश मातृवाचक पदाने केला जातो. मातृभूमी, मायबोली, Mother Land, Mother tongue असा. जगातील सर्व भाषांमधील असे शब्द माउलीची महत्ताच सुचवीत असतात.अलीकडे तर वैज्ञानिक प्रयोगांनी स्त्रीचे श्रेष्ठत्व सप्रमाण सिद्ध केले आहे. केवळ स्त्रीच क्लोनिंग-तंत्राद्वारे आपल्या शरीरातील एखाद्या पेशीची गर्भपेशी बनवून ती गर्भाशयात वाढवू शकते आणि पुरुषाविना बाळाला जन्म देऊ शकते. उत्क्रांतीच्या सर्वोच्च स्थानावर पुरुष नव्हे, तर स्त्री उभी आहे, असाच याचा अर्थ होतो.
सृष्टिनिर्मितीचक्रात स्त्रीचे असे अपरिहार्य स्थान असल्यामुळे संतकवींना स्त्रीत्वाचा- विशेषत: तिच्या मातृरूपाचा मोह पडावा, यात नवल नाही. स्वत:कडे स्त्रीची भूमिका घेऊन पंढरीनाथाच्या दर्शनासाठी विरहव्याकुळ होणारे ज्ञानेश्वर उगाचच आपल्याला विराण्यांतून भेटत नाहीत. ‘दिनु तैसी रजनी मज जालिये माये । अवस्था लावूनि गेला अजुनि कां न ये ।।' अशा प्रत्ययकारी शब्दांतून ते आपल्या मनोवस्थेचे चित्रण करतात ते यामुळेच. स्त्रीच्या अनुभवविश्वातील गहिरेपण आणि तिचे आयुष्य कृतार्थ करणारे आईपण संतकवींना आणि संतकवयित्रींना सतत साद घालत राहिले आहे.
आई आणि वडील यांच्या मनोवस्थांतील अंतर स्पष्ट करणारा प्रसंग सांगता येईल. मूल जर चिखलात बरबटून घरात आले तर वडील त्याला पटकन् जवळ तर घेणार नाहीतच, पण ‘‘जा, तुझ्या आईकडे जा'' असे सांगतील. ते मूल आईजवळ जाताच ती त्याला स्वच्छ करील, स्वच्छ कपडे घालील आणि मग वडलाकडे पाठवेल. लेकबाळ सासरहून माहेरी आली तर आईच्याच कुशीत शिरून मुसमुसत राहते. तिला सासरी कोणते दु:ख आहे हे आईला न सांगताच समजते. आईचा पदर म्हणजे बाळाचे संरक्षक कवच. म्हणून जनाबाईने आपल्या भावविश्वात विठ्ठलाचे लेकुरवाळे रूप पाहिले आणि अभंगात ते शब्दबद्ध करून ठेवले.
अशी ही संतांची माउली! ती केवळ माउलीच नव्हे, तर शीतल सावलीदेखील आहे. रणरणत्या उन्हात वैराण माळ तुडवणा-या माणसालाच डेरेदार वृक्षाखालच्या थंडगार सावलीतले सुख काय ते कळते. वृक्षछायेतले गार सुख भोगायचे असेल तर उन्हात तापले पाहिजे. पोटात कावळे ओरडतात कसे, आतडी कशी गोळा होतात हे अनुभवायचे असेल तर पोटात भुकेचा डोंब उसळू द्यायला हवा. त्यानंतरच अन्न हे परब्रह्म का आहे, हे कळू शकते आणि अन्नसेवनानंतर सर्वांगावर तृप्ती कशी ओसंडत राहते, हेही समजते. त्याप्रमाणे जो संसारतापाने होरपळून निघतो अशा जीवालाच विठ्ठल ही ‘शीतल साउली' का आहे ते समजू शकते.
शीतल साउली असलेल्या विठाई माउलीला पान्हा फुटला आहे. हा पान्हा आहे प्रेमाचा. आईच्या दुधावर लेकराचा आणि गाईच्या दुधावर वासराचा निसर्गदत्त हक्क असतो. त्याप्रमाणे भक्ताचाही विठाई माउलीच्या प्रेमदुधावर हक्क असतो. म्हणून तिच्या मांडीवर बसून, कुशीत शिरून मनसोक्त दूध पिण्याची इच्छा त्याच्या मनात नांदत असते. आईच्या दुधावर बाळाच्या स्थूलदेहाचे पोषण होते, तर विठाईच्या प्रेमदुधाने भक्ताच्या अंतरंग-जीवनाचे -आध्यात्मिक पिंडाचे- पोषण होते. आईचे दूध बाळासाठी अमृतासारखे संजीवक असते, तसेच भक्तासाठी प्रेमदूधदेखील संजीवकच असते. ज्या प्रेमाने जन्ममृत्यूचे चक्र थांबून अमृतरूपी परमेशाचा लाभ होतो त्या प्रेमाची महती काय वर्णावी? त्याला कशासोबत तुळावे? प्रेमदुधाच्या प्राशनाने देह-मनावर ओसंडणारी तृप्ती कोणत्या शब्दांत सांगावी? ती सांगताना तर सागराची उपमाही अपुरीच पडेल.
बाळ दूर गेले तर आईला चिंता पडते. खरे तर तिला चिंताअसते ती रांगणा-या बाळाची, नीट चालणा-या मुलाची नव्हे. मूल घरभर रांगत असताना आई एका कोप-यात धान्य निवडत बसलेली असली तरी तिचे सर्व लक्ष बाळाकडेच असते. ते कुठे पडणार तर नाही, उंबरठ्याबाहेर तर जात नाही, याकडे ती नजर ठेवून असते. जणू त्याच्याभोवती आपल्या नजरेचा परकोट उभा करून असते. केवळ दृष्टीने कासवी आपल्या पिलांना भरवते अशी कविकल्पना आहे. त्याप्रमाणे केवळ दृष्टीनेच आई बाळाचे संरक्षण करीत असते. तिची दृष्टी बाळाच्या मागेपुढे भिरभिरत जणू त्याला सांभाळत असते. (यामुळेच ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी'च्या बाराव्या अध्यायात श्रीगुरूच्या कृपादृष्टीला माउली असे संबोधिले असावे.)
तान्ह्या बाळाला स्वत:ची चिंता करावी लागत नाही. त्याची सर्व चिंताआईच वाहत असते. त्याला भूक लागण्याआधी त्याची भूक आईलाच लागत असते, जाणवत असते. त्याची तहान आईलाच लागते. त्याप्रमाणे जो भक्त विठाई माउलीचे तान्हे बाळ होतो, त्याला पूर्ण आत्मसमर्पण करतो, त्याची सर्वचिंताविठाई माउली वाहते. (‘योगक्षेम वहाम्यहम्।' असे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने उगाच वचन दिलेले नाही.) पण त्यासाठी तान्हे बाळ मात्र होता आले पाहिजे. तुकाराम महाराज आपल्या भावविश्वात विठाई माउलीचे तान्हे बाळ होतात आणि आत्मप्रत्ययाने म्हणतात:-
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणे।
लडिवाळ तान्हें विठाईचें।।
***
No comments:
Post a Comment